ती तलवार (Marathi Lyrics – Baghtos Kay Mujra Kar)

0
1687

ती तलवार Lyrics

सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..

आई फिरविते हात कपाळी,
सांगे लेकराला तुझीच कथा,
वाटेकडे बघ डोळे लागले,
सांग भेटशील कधी रे आता..

तुझी लेकरे रोज नव्याने,
शोधात राहती तुझ्या खुणा,
उतरून तू टाक आम्हाला,
जन्माला तू ये रे पुन्हा..

पुन्हा तुझा आवाज ऐकण्या,
पंचप्राण हे येतील का रे,
डोळ्यांची हि निरांजने ही,
औक्षण करती डोळे भरुनी..

लक्ष टोपडी शिवली जातील,
सर सर सर सर सर सर सर सर,
माया भरल्या साड्या मधुनी,
लाख कड्याना आकार येईल,
पोलादाच्या कामा मधुनी..

पायी वाळा तुला घालतील,
आगीतून तावुन सुलाखुनी,
तीट लावण्या काजळ देईल,
रयतही अंधाराचे घेऊनी..

असा हवा जी.. बाल शिवाजी,
असा हवा जी.. बाल शिवाजी,
मुलखाचा होईल कडा..

उतरून तू टाक आम्हाला,
जन्माला तू ये रे पुन्हा..

पाठीशी असतील मावळे,
अंगावर घेशील वादळे,
कधी गडावर कधी खिंडीतून,
शौर्याचे मग रोज सोहळे..

तुटलेल्या साऱ्या सांध्यांना,
पुन्हा एकदा जोडशील तू,
अरे लाख असू देत अफजल आता,
वाघ नखाविना फाडशील तू..

पण कारस्थानं शिजतील,
डाव आखले जातील,
तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील..

संकटांचे वादळ येईल,
आभाळाचा अग्नी होईल,
डोळ्यादेखत तांडव सारे,
तू एकटा कसे रोकशील..

धावून येई मग ती शक्ती,
जिच्यावरी रे अखंड भक्ती..
धावून येई मग ती शक्ती,
जिच्यावरी रे अखंड भक्ती..

उघडून दिव्यत्वाचे दार,
आई भवानी घे अवतार..

घे अवतार, घे अवतार,
आई भवानी घे अवतार..
घे अवतार, घे अवतार,
आई भवानी घे अवतार..

हात पसरतो आई भवानी,
बळ द्यावे अपरंपार,
शिवबा लढ तू प्राणपणाने,
हाती देई ती तलवार..

ती दुमदुमणारा एक हुंकार,
जिर जिर जी जी,
ती वज्राची रे लख्ख किनार,
जिर जिर जी जी..

ती चैतन्याचा साक्षात्कार,
तू आण पुन्हा रे ती तलवार..

तू आण पुन्हा रे ती तलवार..