जजमेंट (Judgement Marathi Review)

0
758

जजमेंट  हा चित्रपट ज्योत्स्ना फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत आहे. नीला सत्यनारायण कादंबरीवर आधारित ही एक सत्य घटना आहे. दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी अत्यंत मेहनतीने ही संकल्पना मांडली असून 24 मे 2019 ला प्रदर्शित होईल. आई आणि मुलीची भावनिक सोबत उत्कृष्टपणे रेखाटली आहे. बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी यामुळे मुलींचे दिवसेंदिवस समाजातील घटते प्रमाण, उच्चशिक्षित लोकांची माणुसकीला काळिमा फासणारी गलिच्छ विचारशैली, स्त्रियांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ अशा सर्व गुंतागुंतीच्या घटनांमधूनही चित्रपटाची व्यवस्थित निर्मिती करण्यात आली आहे.

   समाजातील गलिच्छ प्रवृत्ती, नावलौकिक मिळवण्यासाठी घराला वारस हवा, या हव्यासापोटी स्वतःच्या बायकोचा जीव घेणारे आयएएस अधिकारी अग्निवेश साठम ( मंगेश देसाई ) यांनी खलनायक ही भूमिका केली आहे. आईची  छत्रछाया हरवल्यानंतर त्यांचे आबा  ( माधव अभ्यंकर ) अतिशय प्रेमळ संस्कारात मुलींना घडवतात.आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण स्त्री जातीच्या अस्तित्वासाठी,अन्यायाविरुद्ध एल्गार करणारी, खंबीरपणे आपली लढाई जिंकण्यासाठी निघालेली रुजूता साठम  ( तेजश्री प्रधान )  आपली सत्याची बाजू असूनही परंतु कोणताही भक्कम पुरावा नसतानाही यशस्वी होईल का?माणूसकीहीन असलेल्या आयएएस अधिकारी अग्निवेश साठम  (मंगेश देसाई ) याला धडा शिकवणार का?  चित्रपटातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, ङगमगता धैर्याने आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली धाडसी मेहनत ही समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. दिग्दर्शक समीर सुर्वे यांच्या मते, ही एक सत्य घटना असून चित्रपटात त्या घटना मांडताना खूप मेहनत घ्यावी लागली. त्याचप्रमाणे अग्निवेश साठम (मंगेश देसाई ) ही एक बोलकी व्यक्तिरेखा असूनही चित्रपटातील त्यांचे वेगळेपण दिसून येते. त्याचबरोबरहोणार सून मी या  घरचीया  मालिकेतून नावाजलेली  अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारलेली एक आदर्श वकिलाची भूमिका देखील उल्लेखनीय आहे. चित्रपटातीलआहे सोबत तूआणिएल्गारहे नवल शास्त्री यांचे अप्रतिम संगीत उल्लेखनीय आहे. रुजूता हिची कर्तृत्ववान भरारी, सत्याने लढलेली अन्यायाविरुद्ध लढाई ही संपूर्ण स्त्री शक्तीसाठी कौतुकास्पद आहे. यासाठी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

Rating: 4/5
:- प्रियांका पवार.