Miss U Mister (Marathi Review)

0
776

‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट कौटुंबिक पातळीवर घडणाऱ्या समस्यांचा नात्यांवर कशाप्रकारे परिणाम होतो, यावर आधारित आहे. अनेक गाजलेले चित्रपट तसेच लोकप्रिय टिव्ही मालिका यांमधून नावारूपास आलेले समीर हेमंत जोशी यांच्या स्वकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ‘वरुण’ या मुलाची भूमिका ( सिद्धार्थ चांदेकर ) यांनी साकारली आहे. तर ‘कावेरी’ ही भूमिका ( मृण्मयी देशपांडे ) यांनी अत्यंत सुंदर मांडली आहे. सासू – साजरे असूनही आई- वडिलांप्रमाणे जीव लावणारे ( अभिनेते राजन भिसे ) तसेच ( अभिनेत्री सविता प्रभू ) यांची प्रेम, जिव्हाळा, काळजी यातील भूमिका अत्यंत आपुलकीने साकारली आहे. आई- बाबा, सासू – सासरे, सासर – माहेर या सर्व जबाबदारीचा घटनाक्रम योग्य प्रकारे सांभाळत असलेली कावेरी ही मुलींसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल. येत्या 28 जून 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पारिवारिक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी घरापासून दूर विदेशी राहून आपल्या माणसांचा विरह सहन करणे, या गोष्टी उत्कृष्ट रीतीने मांडल्या आहेत. अत्यंत धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे, सहवास मिस करणे, एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही ताटातूट सहन करणे. या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मुलगा परदेशी असताना काळजावर दगड ठेवून आपल्या सूनेला क्षणोक्षणी सुखी ठेवणारे सासू- सासरे यांचे वागणे देखील कौतुकास्पद आहे. संगीतकार देसाई यांचे ‘तुझी आठवण’ हे गाणे अगदी मनातील आठवणींनाउजाळा देत बहरणारं आहे.चित्रपटात कावेरी आणि वरुण या दोघांनाही पारिवारिक जबाबदारी पार पाडण्यासाठी एकमेकांपासून दूर राहावे लागते. तसेच वरुणचे काही दिवस घरी आल्यानंतरही कावेरीला वेळ न देणं . यामुळे तिची मनस्थिती खालावते. तर दुसरीकडे कावेरीचे काहीही व्यक्त नाही करणे, यामुळे वरुण स्तब्ध राहतो. वरुण कावेरीच्या प्रेमाच्या नात्याला बहर केव्हा येणार?? ते दोघेही एकमेकांमधील दुरावा संपुष्टात आणतील का?? हा चित्रपट आजच्या तरुणपिढीसाठी एक आदर्श ठरेल. परिस्थितीशी मिळतं -जुळतं घेऊन एकमेकांना सांभाळून घेत स्वतःची जबाबदारी पार पाडणे. दूर राहूनही नात्यांमधील गोडवा कसा जपावा, याचे आकलन या चित्रपटातून होईल. यासाठी हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा.

– 4/5
(Priyanka Pawar)