‘Banu Baya’ from ‘Jai Malhar’ Lyrics (Marathi) [Old Serial]

0
367

‘Banu Baya’ from ‘Jai Malhar’ Lyrics (Marathi)

खंडेराया देवराया…
थाटुन आलासा नळदुर्गाला…
घेऊन जाया बानुबया…
ऐटीत बांधलासा मुंडावळ्या…
मंडप आभाळी इंद्रधनुचा…
भूमिला स्पर्श झाला देवगणांचा…

नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया…
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया…

श्रध्देचा गाठुन डोंगर हिच्या भक्तिनं गाठला हा दिवस असा,
हळदीनं भरुनिया ओंजळ देवरायानं दिला जणु जन्म नवा..
गणपती ही गाली हसे नंदी बघा कसा नाचे…
हे गणपती ही गाली हसे नंदी बघा कसा नाचे…
डमरुचा नाद भिडे तो गगणाला..
शंख नाद होई तिथं जेजुरीला…
नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया..
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया…

कशी नटलीया सजलीया बानुबया..
गोड गालात हसतीया बानुबया…
ऊर दाटुन बघतीया आल्या मेळा…
कशी जिवाची घालमेल बानुबया…
व्रतवैकल्याच्या माळा हिनं माळल्या हो मोठ्या शर्तिनं…
सोसुन शत शत पिडा हिला स्विकारल भोळ्या मल्हारीनं…
लक्ष्मी सरस्वती आली, ब्रम्हा विष्णु अवतरले…
अर लक्ष्मी सरस्वती आली न् ब्रम्हा विष्णु अवतरले,
नारद मुनिंनी स्वर आळविला…
मंगलाष्टकांचा स्वर गगणी भिडला…

नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया…
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया…