‘Radha Prem Rangi Rangli’ Title Song Lyrics (Marathi) [Colors Marathi]

0
593

‘Radha Prem Rangi Rangli’ Title Song Lyrics (Marathi)

स्वप्नातल्या साऱ्या कळ्यांनी उमलून यावे वाटते
नकळे मला का मोरपंखी हुरहूर जीवाला लागते
मन हे असे, का होते रे वेडेपिसे
रंगली रंगली प्रेमवेडी सखी स्वप्नात ह्या रंगली
रंगली रंगली प्रेम रंगात ह्या राधा जणू रंगली
राधा प्रेम रंगी रंगली

दरवळतो विरघळतो श्वास-श्वास जपलेला
गुणगुणतो ऋणझुणतो भास-भास लपलेला
जुळले कसे, हे नाते नव्याने असे
रंगली रंगली प्रेमवेडी सखी स्वप्नात ह्या रंगली
रंगली रंगली प्रेम रंगात ह्या राधा जणू रंगली
राधा प्रेम रंगी रंगली