‘Ithech Taka Tambu’ Title Song Lyrics (Marathi)
नका घेऊ टेंशन
नका करू चिंता
दुर जाई दुःख सारे
रामाश्रया येता
सावलीत प्रेमाच्या या
घडीभर थांबू
निळ्याक्षार पाण्यामध्ये
चला थोडे डुम्बु
इथेच टाका तम्बू …
इथेच टाका तम्बू …
कशासाठी पोटासाठी
मोदकांच्या ताटासाठी
कशासाठी पोटासाठी
कोलंबिच्या ताटासाठी
मोदकांच्या ताटासाठी..
कोलंबिच्या ताटासाठी..
धा धा तिरकिट धा…
धा धा तिरकिट धा…
जाई जुई पारिजात
जासवंदी अबोली
मने जशी शहाळात
मलाई भरली
गोड गोड आंबे नी
फनसाचे गरे
रानातला मेवा
चला फस्तकरू सारे
अतरंगी माणसांच्या
कथा कथा साऱ्या
हसता हसता कधी
डोळे भरणाऱ्या
इथल्या गजाली भारी
दुनियेला सांगू
इथेच टाका तम्बू …
इथेच टाका तम्बू …