“Tu Majha Saangaati” Title Song Lyrics (Marathi) [Colors Marathi]

0
2385

“Tu Majha Saangaati” Title Song Lyrics (Marathi)

तुझे आभाळाचे रूप
माझा देह माती माय
कधी करपले दूध
कधी दाटलेली साय

उभे भांडण जन्माशी
तरी गाथा सांभाळीला
तुझ्या थोरवीचा आहे
माझ्या माथ्यावर टिळा

जगण्याच्या समयीत
तुझ्या अभंगाच्या वाती
वादळात चालताना
तू माझा रे सांगाती
तू माझा सांगाती…