तू चालपुढे (Marathi Lyrics – Sangharsh Yatra)

0
295

तू चालपुढे

तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला ,
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला.

जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची,
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची.

राज्य असो व नसो असे हा ताज तुझ्या रे माथी,
इतिहाची भविष्याची हि लाज तुझ्या रे हाती.

उमलून येऊ दे मातीतून पालवी सन्मानाची,
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची.

तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला ,
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला.

जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची,
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची.