आटपाडी नाईट्स

0
573

नितीन सुपेकर दिग्दर्शित आटपाडी नाईट्स हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोंबर 2019 रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. आपल्या समाजात एखाद्या गोष्टीत कुणी कुठेतरी कमी पडत असेल तर त्याला आधार देण्याऐवजी हिणवण्याची सवय आहे, असे या चित्रपटात पाहायला मिळते.

या चित्रपटात एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा वसंता (प्रणव रावराणे ) हा शरीराने खूप किरकोळ असल्याने त्याचे काहीही केले तरी लग्न जुळून येत नाही. त्याचे मित्र त्याला खूप सल्ले देतात. परंतु तरीही त्याला अपयश येते. शेवटी आटपाडी या गावातील प्रिया (सायली संजीव ) हिला पाहण्यासाठी वसंतराव खाटमोङे आपल्या संपूर्ण कुटुंबासह जातो. कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने अखेरीस प्रिया सोबत त्याचे लग्न जुळून येते. परंतु लग्नानंतर रात्रीचा कार्यक्रम तुला जमेल का? असे म्हणत संपूर्ण गाव वसंताची खिल्ली उडवतो. यासाठी बिचारा साधा – भोळा वसंता आपल्या परीने परफेक्ट बनण्यासाठी खूप धडपड करतो. आपल्या मित्रांच्या सल्लाने तो निरनिराळे उपाय करतो.

लग्न झाल्यानंतर आपल्या सुंदर बायकोला म्हणजेच प्रियाला वैवाहिक सुख देण्यात वसंता यशस्वी होईल का? जर वसंताने प्रियाला वैवाहिक जीवनात आनंदी ठेवले नाही, तर प्रिया देखील वसंताला सोडून निघून जाईल का ? असे बरेच प्रश्न आपल्याला सतावतात.

विजय गावंडे यांच्या संगीताचे मधूर बोल मनमोहक प्रेमाची अनुभूती देतात. आपल्या समाजात मुलांना लैंगिक शिक्षणाचे ज्ञान देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या हातून काही वाईट चूका घडून येणार नाहीत. कारण लहान वयात केलेल्या चुकांचे घातक परिणाम त्यांचे आयुष्य विध्वंस करू शकतात. यासाठी नव्या तरुणाईने हा चित्रपट आवर्जून पाहावा.

3.5

प्रियांका पवार.