चॉकलेट बॉय आरोह वेलणकरने दिली त्याच्या चाहत्यांना ट्रिट

0
320

बिग बॉस मराठीतला हँडसम हंक अभिनेता आरोह वेलणकरने एका ‘मीट अँड ग्रीट’ सेशनचे आयोजन करून नुकतीच आपल्या चाहत्यांची भेट घेतली. विकेन्डला झालेल्या ह्या सेशनला महाराष्ट्रभरातून आलेल्या आपल्या चाहत्यांसोबत गप्पा-गोष्टी, गाणी- डान्स करत आरोहने छान मजा-मस्ती केली.

आरोह वेलणकर ह्या ‘मीट अँड ग्रीट’ सेशनच्या आयोजनाविषयी सांगतो, “रेगे सिनेमामूळे माझा चाहतावर्ग निर्माण झाला. नुकताच बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केल्यावर तर माझा चाहतावर्ग वाढलाय, हे माझ्या लक्षात आलं. कधी भेटून, कधी मेसेजस, फोन क़ॉल्स करून तर ब-याचदा सोशल मीडियाव्दारे वेगवेगळे फॅन्स माझ्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत होते. ह्या फॅन्समुळेच मी बिग बॉसच्या घरात खरं तर, सहा आठवडे राहू शकलो. त्यामुळे त्यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करावी, असं मनात होतं. म्हणूनच त्यांना मी विकेन्डला एक छोटीशी ट्रिट दिली.”

आरोह पूढे म्हणाला, “पहिल्यांदाच अशा फॅनमीटव्दारे मी माझ्या चाहत्यांना भेटलो. त्यांच्यासोबत गप्पा मारणं, सेल्फी काढणं, त्यांची काही सजेशन्स ऐकणं हे सर्व करताना खूप मजा आली. माझ्या कुटूंबाशिवाय मी माझ्या फिल्मइंडस्ट्रीतल्या मित्रमंडळीचं एक दूसरं कुटूंब मानतो. आता ह्या फॅन्समुळे मला तिसरं कुटूंब मिळालंय, असं मला वाटतंय. आणि ह्या कुटूंबाशी मी आता सातत्याने टचमध्ये राहणार आहे.”

बिग बॉसमूळे आरोह वेलणकरशी निगडीत ‘शेर आया शेर’, ‘पोरी पडत्यात’, ‘ए आरो’, ‘विषय कट’ असे काही वनलाइनर्स प्रसिध्द झाले. हे वनलाइनर्सही त्याच्या चाहत्यांना खूप आवडले. ह्या वनलाइनर्सचे टी-शर्ट्स आरोहने त्याच्या चाहत्यांना भेट केले. आरोहच्या फॅनमीटला झालेल्या चाहत्यांची गर्दी पाहता, आरोहने बिगबॉसची ट्रॉफी जिंकली नसली, तरीही रसिकांची मनं जिकली असल्याचंच दिसून आलंय