दिशा दिपा फिल्म्स व विप्रा एण्टरटेन्मेंट निर्मित राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित परंपरा आणि आधुनिकतेची गाठ बांधणारा ” श्री राम समर्थ ” हा सिनेमा 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

0
467

विप्रा एनटटरटेन्मेंटच्या अश्विनी महेश्वरी आणि दिशादीप फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांच्या निर्मितीच्या भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे.

घराघरातील संस्कारांचा पाया असलेले मनाचे श्लोक याचे उद्गाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा आजही घराघरात जपला जात आहे. लग्नातील ” सावधान “या शब्दांतील नेमका अर्थ समजावून घेणारा छोटा 12 वर्षांचा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या पावलोपावली पाहायला मिळते.

सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच बाळासाहेब सावंत आणि सौ. मीना निकम यांची सुमधूर आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत. दासबोध या ग्रंथातील 28 ओव्या सिनेमातील संवादांना नेमका अर्थ मिळवून देतात.