‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचा शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी

0
73

निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या डॉक्टर डॉक्टर चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. या नव्या चित्रपटाचा शुभारंभ पुण्याच्या जागृत देवस्थानात म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याच्या तयारीस लागला आहे. निर्माता किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक सह निर्माता हर्षवर्धन भरत गायकवाड यांचाही निर्मिती क्षेत्रात वाटा आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून चित्रपटात बऱ्याच दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे परंतु तूर्तास या चित्रपटातील कलाकार अजूनही गुलदस्त्यात आहेत.

या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. या शिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटातील गाण्यांनी. लॉक डाऊन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे. याशिवाय आज निर्माता अभिनेता अमोल कागणेचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत गणपती बाप्पांना वंदन करून त्यांनी चित्रपटाचा शुभ मुहूर्त करण्यात आला आहे. त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नालासुद्धा रसिक-मायबाप तितकंच प्रेम देतील अशी आशा आहे.

पहा सगळे फोटो  व व्हिडिओ अणि मराठी अपडेट जाणून घ्या फक्त आमच्या Instagram पेज वर: https://www.instagram.com/marathisanmaan/ (आम्हाला नक्की Follow करा)