वेबसिरीज चाहत्यांसाठी भारताचा अग्रेसर प्लॅटफॉर्म असलेला MX Player घेऊन येत आहे. #Pandu #WeekendBingeonMX

0
366

वेबसिरीज चाहत्यांसाठी भारताचा अग्रेसर प्लॅटफॉर्म असलेला MX Player घेऊन येत आहे. #Pandu #WeekendBingeonMX #Pandu या फुल टू धम्माल मराठी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेबसिरीज 20 सप्टेंबर पासून आपल्याला MX Player वर विनाशुल्क पाहता येईल.

अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित ” पांडू ” ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन जीवनावर आधारित आहे. सुहास शिरसाठ आणि दीपक शिर्के या दोन धाडसी व कर्तृत्ववान पोलिसांची ही कथा आहे. जे आपले शहर सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच झटत असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या दररोजच्या आयुष्याचे वर्णन खूपच आकर्षकरीत्या विनोदी पद्धतीसह करण्यात आले आहे.

आपणांस ठाऊकच आहे की, पोलीस हे दिवस – रात्र त्यांचे कार्य पार पाडत असतात. मुंबई सारख्या शहराचे संरक्षण करणं, हे काही सोपे काम नाही. परंतु तरीही आपले मुंबई पोलीस हे निङरपणे आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपली जबाबदारी चोखपणे पूर्ण करतात.

या वेबसिरीज मधून दिग्दर्शक सारंग साठे सांगतात की, पोलिसांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलेले असते. परंतु पोलीस हा देखील एक माणूसच आहे. खाकी वर्दीच्या गणवेशा पलीकडे त्याचेही स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. पोलिसांना देखील भावना आहेत. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आयुष्य जगू शकतो. अशा या खाकी वर्दीतील आपल्या पोलिसांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी ” पांडू ” ही वेबसिरीज अवश्य पाहा.