वेबसिरीज चाहत्यांसाठी भारताचा अग्रेसर प्लॅटफॉर्म असलेला MX Player घेऊन येत आहे. #OnceAYear #WeekendBingeonMX

0
307

#once a year या प्रेमरंगीन मराठी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेबसिरीज 20 सप्टेंबर पासून आपल्याला MX Player वर विनाशुल्क पाहता येईल. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले हे मुख्य भूमिकेत आहेत. सहा भागांच्या या वेबसिरीजमध्ये प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे.

प्रेम हे एक सुंदर नातं आहे. ” दोन जीव एक श्वास ” अशा गोङ नात्याचा सुंदर लव्हस्टोरी तुम्हाला पाहायला मिळेल. कॉलेज मधील अल्लड मैत्री पासून ते प्रेमाच्या नात्याची जाणीव होईपर्यंत, त्यांच्या सर्व अनमोल आठवणी देखील अनुभवता येतील.

दिग्दर्शक मंदार कुरुंदकर यांच्या मते, एका नजरेत जङलेलं प्रेम हे आयुष्यभराच्या साथीची शाश्वती देऊ शकत नाही. प्रेमाच्या नात्याला फुलण्यासाठी, बहरण्यासाठी काही दिवसांचा अवधी गरजेचा असतो. निपुण आणि मृण्मयी हे दोघे एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या आवडी- निवडी सांभाळत, एकमेकांचे विचार जाणून घेत कशाप्रकारे प्रेमाचं नातं मजबूत बनवतात. हे आपणांस पाहायला मिळेल.

या वेबसिरीजमध्ये प्रेमी – युगूलांच्या नात्याला नव्याने पालवी फुटेल. यासाठी सर्वांनीच सुंदर व मनमोहक प्रेमाच्या नात्याचे आकर्षण जपण्यासाठी ही वेबसिरीज आवर्जून पाहा.