” हिमालयाची सावली ” तब्बल 40 वर्षांनंतर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज…….

0
571

मराठी संस्कृतीला नाट्यकलाकृती शिवाय सौंदर्य नाही. उत्कृष्ट लेखणी, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे गाजलेली रंगभूमी हीच तर आपल्या महाराष्ट्राची अप्रतिम ओळख आहे.

नवनवीन कल्पना समाजासमोर मांडण्यासाठी अनेक नाट्यकलाकृती रंगभूमीवर येत असतात. प्रा. वसंत कानेटकर यांच्या अनमोल लेखणीतून सजलेलं आणि ङॉ. श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ या ज्येष्ठ दिग्गजांच्या अभिनयाने गाजलेलं ” हिमालयाची सावली ” हे नाटक लवकरच रसिकांसमोर येत आहे. 1972 मधील रंगभूमीवर हे नाटक प्रथम आले होते. आता तब्बल 40 वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. सुप्रिया प्रॉडक्शन प्रस्तुत असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई असून या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे हे आहेत.

एका तटस्थ समाज कार्यकर्त्याच्या जीवनसंगिणीला कशाप्रकारे आपलं संपूर्ण आयुष्य जगावे लागते. या उद्देशाने निर्मित केलेलं हे नाटक जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारं आहे. त्यामुळे त्या काळातील दिग्गजांनी गाजवलेलं नाटक आम्हांला करायला मिळणे, हे आमचे खरंच खूप मोठं भाग्य आहे. असे या नाटकातील कलाकारांचे म्हणणे आहे.

“हिमालयाची सावली ” या नाटकाच्या नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारली आहे. इतर सहकलाकारांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या नाटकाचा शुभारंभ रविवार 29 सप्टेंबर कालिदास नाट्यगृहात होईल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्यकलाकृतीचा आनंद घ्यावा.