आई-लेकीमधील हळव्या संवादाला लाभले अमृतस्वर

0
1493

   इंदू सरकार चित्रपटातील ‘यह पल’ गाण्याने सत्तरीच्या गाण्यांची जादू रसिकमनांवर केल्यानंतर आता अमृता फडणवीस यांच्या आवाजाने सजलेला आई-लेकीतील हळवा संवाद प्रेक्षकांना मोहिनी घालणार आहे.

          ‘परी हूँ मैं’ या चित्रपटासाठी ‘चांदणं बिलोरी कळ्या’ हे गाणं गाण्यासाठी अमृता फडणवीस आता सज्ज झाल्या आहेत. आई-मुलीतील नातं दर्शवणाऱ्या या गाण्यातून अमृता आणि त्यांची लेक दिविजा यांच्यातील गोडवा डोकावेल यात शंका नाही. या हळव्या नात्यातील गोडवा अभिषेक खानकर यांनी शब्दबध्द केला असून त्याला संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं आहे.

          ‘जय गंगाजल’ चित्रपटातील ‘सब धन माटी’ गाण्यातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी संघर्षयात्रा चित्रपटाच्या गाण्यातून सगळ्यांनाच प्रेरणा दिली तर हल्लीच आलेल्या ‘फिर से’ या गाण्याच्या विडिओतून रसिकांना स्वत्वावर विश्वास ठेवण्यासाठीचा संदेश दिला. आपल्या आयुष्यात वेगवेगळी पात्र सक्षमतेने निभावणाऱ्या अमृता यांचा आणखी एक पैलू डॉ. राजेंद्र प्रताप सिंग निर्मित आणि रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं चित्रपटाच्या चांदणं बिलोरी कळ्या या गाण्याच्या निमित्ताने समोर येणार आहे. या गाण्यातून अमृता फडणवीस यांच्यातील आई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.