“डॉ. तात्या लहाने … अंगार … पावर इज विदीन”

0
360
http://www.marathisanmaan.com/wp-content/uploads/2017/11/DGV_3041.jpg

डॉ. तात्या लहानेअंगारपावर इज विदीन” — “कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा  संघर्षाची, कथा जिद्धीचीअसलेला चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा  संघर्षाची, कथा जिद्धीचीअसलेला  चित्रपट डॉ. तात्या लहानेअंगारपावर इज विदीन हा  विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मातृत्व जिद्द तसेच स्वामी विवेकानंद यांचा त्याग संघर्ष या गुणांना अभिवादत करण्याच्या हेतूने या दोन्ही महामानवांच्या जयंती दिनी म्हणजेच १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर विराग मधुमालती वानखेडे यांनी सांगितले.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर विराग मधुमालती वानखेडे यांनी आज २०,००० चौरस फूट चेकर पोस्टर र.फा. नाईक कॉलेज च्या भव्य प्रांगणात  फेलावून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने “डॉ. तात्या लहाने … अंगार … पावर इस विदीन” प्रदर्शनांच्या तारखेची घोषणा केली व याचे चित्रीकरण ड्रोनच्या साह्याने टिपण्यात आले . अशाप्रकारे  या चित्रपट  प्रदर्शनांच्या तारखेची घोषणा करण्याची पद्धत प्रथमच मराठी चित्रपट सृष्टीत  करण्यात  आली आहे. या दमदार सोहळ्यात श्री. गणेशजी नाईक (माजी पालक मंत्री, ठाणे जिल्हा), श्री जयवंतजी  सुतार (महापौर नवी मुंबई) आमदार श्री. संदिपजी नाईक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर विराग मधुमालती वानखेडे नेहमीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून रेकॉर्ड ब्रेक करत असतात. आजच्या आगळ्या वेगळ्या  प्रदर्शनांच्या तारखेची घोषणा करण्याच्या पद्धती बदल विचारले असता ते म्हणाले मी या आधी मी नेत्रदानाच्या जागृतीसाठी “रोशनी जिंदगी में” या अभियानांच्या अंतर्गत अंधव्यक्तीच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तब्बल १०० दिवस स्वतः च्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांचे दु:ख अनुभवले.

शिवाय आजवर केलेल्या ४ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल सांगितले शिवाय हा चित्रपट समाजाला नवीन दिशा देणारा ठरेल व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. 

डॉ. तात्या लहानेअंगारपॉवर इज विदीनहा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेश यातून दिला आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची हीबायोपिकआजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.

सिनेमाचे निर्मातादिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन ते अडीच तासामध्ये अतिशय उत्तमरित्या गुंफला आहे. रिले सिंगिंग या उपक्रमाने या सिनेमाचं वेगळेपण अधिक वाढलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ गायकांनी सलग वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गात हे गाणे सादर करून एक वेगळी संकल्पना पहिल्यांदाचं चित्रपटांत सादर केली आहे. या चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला असूनकाळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू‘… हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायले आहे. तसेच हे गाणेएक हिंदुस्थानीयांनी संगीतबद्ध केलं आहे, केतकी माटेगावकरनेही या सिनेमात एक गाण्यासाठी आवाज दिला आहे.

या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.