राहुल अंजलीच्या घरी झाली गणेशोत्सवाची पूर्वतयारी !

0
1711

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या आदर्श जोडीच्या हस्ते लॉंच झालातुला कळणार नाहीचा ट्रेलर

काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग प्रत्येक घराघरात आणि सार्वजनिक मंडळात आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तसूभरदेखील कमतरता पडता कामा नये, याची खबरदारी प्रत्येकजण घेताना दिसून येत आहे. अगदीतुला कळणार नाहीया सिनेमातील राहुल आणि अंजली, हे पात्र देखील त्याला अपवाद नाही. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शीत येत्या सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील राहुल मानकामे (सुबोध भावे) आणि अंजली मानकामे (सोनाली कुलकर्णी) या जोडींना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी त्या दोघांना मराठी सिनेजगतातील रियल जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी मदत देखील केली. गणपतीची आरास, प्रवेशद्वारावर रांगोळी, मकर आणि सुगंधी अत्तरांचा सडा अशी सुबक तयारी श्री सौ मानकामे यांच्या घरात म्हणजेच दादर येथील प्लाजा सिनेमागृहात पार पडलेल्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान करण्यात आली होती

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात, गणेशआगमनाच्या पूर्वतयारीचा मोठा देखावा उभारण्यात आला होता. अस्सल पारंपारिक पेहराव परिधान करत या सिनेमाच्या सर्व स्टारकास्टनी उपस्थिती लावली होती. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरचे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठीतील आदर्श दाम्पत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नवराबायकोच्या नात्यातील रुसवाफुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम दाखवणारा हा ट्रेलर घराघरातील प्रत्येक नवराबायकोला आपलासा करणारा आहे. वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे, सोडता येत नाही आणि पकडतादेखील येत नाही अशी गत आपल्यापैकी अनेकांची झाली असते. त्यावेळी ते कोणता मार्ग निवडतात? जोडीदारांचे वाढते अहंकार आणि त्यासोबतच वाढत जाणाया अव्यक्त प्रेमाची जाणीव, या द्वंदात अडकलेल्या जगातल्या प्रत्येक नवराबायकोची सुंदर कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या ट्रेलरमधील सुबोधसोनालीची केमिस्ट्री अगदी चांगली जुळून आली असून, त्यांच्या चाहत्यांना राहुल अंजलीची ही लग्नानंतरची लव्हस्टोरी भरपूर आवडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे

तसेच या सिनेमाची आणखीन एक खासियत म्हणजे मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी यात निर्मात्याच्या भूमिकेत असूनअनेक सुपरहिट सिनेमांचे वितरक आणि निर्माते असलेल्या कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन या जीसिम्सजोडीसोबत तो या पुढील प्रवासातदेखील कायम राहणार आहे. शिवाय श्रेया योगेश कदम यांचा देखील या सिनेमाच्या निर्मितीत महत्वाचा हात असून,  निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘मोडीत निघालेल्या ओढीचीगोष्ट वेड्या जोडीची…’ अशी भन्नाट प्रेमकहाणी सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना गणेशोत्सवाचा कौटुंबिक प्रसाद ठरणार आहे