ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न!

0
1177

एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाहवरच्या गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात समीरपरांजपे आणि आम्ही दोघे राजाराणी’ या मालिकेचा नायक पार्थ अर्थात मंदार कुलकर्णी सध्या एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाता आहेत.प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या दोन्ही नायकांची खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्न झाली असून महिन्याभराच्या आत पुन्हा हे दोघे बोहल्यावर चढणारआहेत.

 अर्थात या मागचे कारणही वेगळे आहे,या दोन्ही मालिकांच्या कथानकातल्या मोठ्या वळणानुसार या दोघांचीही ऑनस्क्रीन लग्न येत्या काहीआठवड्यात होत आहेत. बयोआजी आणि तिचा नातू विलास या दोन व्यक्तीरेखा गोठ या मालिकेमुळे घराघरात पोहचल्या आहेत,बयोआजी सध्याविलासचे लग्न जुळवण्याच्या विचारात आहेत,बयोआजीच्या व्यक्तीमत्वानुसार त्या हाती घेतात ते काम तडीस नेतात,त्यानुसार विलासचे लग्न कोणाशीहोणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

 ‘आम्ही दोघे राजाराणी’ मध्ये सध्या  पार्थ नाईक आणि मधुरा लेले या जोडीची अतरंगी कुटुंबांच्या कधी विरोधात तर कधी पाठिंब्यावर रंगणारीप्रेमकथा निर्णायक टप्प्यावर आहे. या दोघांच्या प्रेमाचे लग्नात होणारे रुपांतर हा धमाल टप्पा पार्थ अर्थात मंदार कुलकर्णीच्या नुकत्याच झालेल्यालग्नाच्या अनुभवाने  विशेष रंगताना दिसतो आहे. स्टार प्रवाहवरचा हा लग्नाचा सीझन प्रेक्षकांना दोन वेगळ्या धाटणीच्या लग्नांचा अनुभव देणारा आहे.