डबल सीटच्या प्रवासानंतर आता समीर म्हणतोय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’

0
920

‘टाईमप्लीज’, ‘डबलसीट’ यांसारख्या उत्तोमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक समीर विद्वांस याच्या ‘वायझेड’ ह्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कौटुंबिक आणि सर्वसामान्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित घडामोडींवर देखील इतके सुंदर चित्रपट होऊ शकतात याची झलक आपणांस समीरचे चित्रपट बघताना येते. बिनधास्त म्हणा ‘मी वायझेड आहे’ असं सांगणारा समीर आता बिनधास्त म्हणा “मला काहीच प्रॉब्लेम नाही” म्हणायला सज्ज झालेला आहे.

एका चांगल्या दिग्दर्शकाची नजर आणि त्याची निवड तीक्ष्ण असते म्हणतात ते समीर च्या बाबतीत अगदी खरं आहे. चित्रपटाचा विषय असो वा चित्रपटाची कास्ट प्रत्येक गोष्टीत त्याचं पर्फेक्शन दिसून येतं. आजवर त्याने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाचे विषय आणि टाईम प्लीज मधील प्रिया बापट उमेश कामत ची जोडी, डबल सीट मधील मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी ची जोडी आणि आता समीर च्या आगामी चित्रपटातील स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांची जोडी यांना इतर कशाचीच सर नाही. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाद्वारे स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी ही नवीन जोडी प्रथमच आपल्या समोर येते आहे. त्यांच्याबरोबरचं निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, मास्टरआरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवि सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित समीर, स्पृहा आणि गश्मीर ह्या त्रिकुटाचा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.