‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट 

0
699

ड्राय डेनावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट 

गोरी गोरी पान, फुलासारखी छान…’ ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामीड्राय डेसिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शितड्राय डेसिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, ‘ड्राय डेची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे

सिनेमा सुपरहिट करण्यासाठी त्यांतील गाण्यांची मोठी भूमिका असते, हे यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘ड्राय डेसिनेमाच्या गाण्यांचा दर्जा लक्षात घेता, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेच सूत्र लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातीलअशी कशीहे रोमँटिक गाणे असो वा, अवघ्या महाराष्ट्राला लग्नसराईत थिरकवणारेगोरी गोरी पानहे गाणे असो हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्यांना लाभला आहे.   

संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी ड्राय डे सिनेमातील सर्व गाण्यांना संगीत दिले असून, त्यापैकी सध्या गाजत असलेले जय अत्रे लिखितअशी कशीहे प्रेमगीत आजच्या तरुणाईला आपलेसे करीत आहे. जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा गोड आवाज या गाण्याला लाभला असल्यामुळे, ते अधिक रोमँटिक झाले आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे आधारित असल्यामुळे, आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर यातून घडून येते. शिवाय समीर सामंत लिखितगोरी गोरी पानया धम्माल गाण्याने तर प्रसिद्धीचा ऊच्चांक गाठला आहे. सोशल नेटवर्किंग तसेच रेडियो मिर्चीवर सलग सहा महिने नंबर पोझिशनवर हे गाणे वाजवले जात आहे. हळदीची मज्जा अनुभवणाऱ्या या गाण्याला रोंकीनी गुप्ता आणि तृप्ती खामकर या हिंदीच्या प्रसिद्ध गायिकांनी आवाज दिला आहे. एव्हढेच नव्हे तर, आजच्या तळीरामांवर आधारित गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील जय अत्रे लिखितदारू डिंग डांगहे गाणेदेखील लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे

तरुणाईचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना येत्या जुलै महिन्यात आगळावेगळाड्राय डेचा आनंद देऊ करणार आहे. या सिनेमात ऋत्विकमोनालिसा बरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन येणार हाड्राय डेइतरांहून अगदी वेगळा असल्यामुळे या हटकेड्राय डेची प्रेक्षकदेखील प्रतीक्षा करत असतील हे निश्चित !