‘मडरश 2016’ ला “डॉ. रखमाबाईं” ची हजेरी टीम रखमाबाईने फुंकला प्रमोशनचा शंख

0
1063

पाऊस पडला, चिखल झाला… हे आपण नेहमीच ऐकतो… या चिखलाचा आनंद कुणी घेतल्याचं आपण कधीही ऐकलेलं नाही… किंवा असं म्हणूयात So called, Sophisticated लोकांना… हे काही जमत नाही… चिखलाची मजा घेण्यापेक्षा पावसाला दोष देण्यातच आम्ही धन्यता मानतो… मात्र नुकताच पार पडलेल्या “मडरश 2016” मध्ये एरव्ही चिखलाला दोष देणारी मंडळी याच चिखलाची मजा लुटताना दिसली. याच सोहळ्यात डॉ. रखमाबाई या चित्रपटाची टीमही उपस्थित होती. गोरेगावच्या फिल्मसिटीत रंगलेल्या या मडरश 2016 ची सुरूवात डॉ. रखमाबाई झालेल्या तनिष्ठाच्या फ्लॅग ऑफ ने झाली. यावेळी चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर, दिग्दर्शक अनंत महादेवन, आणि तनिष्ठाचे या चित्रपटातील सहकलाकार संतोष जुवेकर यावेळी उपस्थित होते.

गडबड, गोंधळ आणि गर्दीतही आनंद लुटणाऱ्या मडरशर्स ना पाहून असाच गडबड, गोंधळ आणि गर्दी डॉ. रखमाबाईंच्या आयुष्यात असून त्यात ही जगण्याचा आनंद त्यांनी घेतला आणि हाच आनंद या चित्रपटाच्या निमित्ताने आपण घेऊन आल्याचे डॉ. रखमाबाई चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी म्हटले. यावेळी आपल्या चित्रपटाविषयी बोलताना तनिष्ठा चॅटर्जी म्हणाल्या, जसे मडरशला कोणतेही नियम लागू होत नाहीत…कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यात भाग घेऊ शकते त्याचप्रमाणे सगळे नियम… अटी बाजूला सारून आपल्या स्वप्नांसाठी लढलेल्या डॉ. रखमाबाई यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. सिंधुताई सपकाळ या महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवल्यानंतर दिग्दर्शक अनंत महादेवन भारताला वैद्यकीय सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य डॉ. रखमाबाई यांची जीवनी आपल्यासमोर मांडत आहेत.

हा चित्रपट करताना खूप मजा आली असून हा केवळ चित्रपट नसून एक बोधकथा असल्याचे अभिनेता संतोष जुवेकर याने मांडले. तर असा हा रॉयल मराठा एंटरटेनमेंटचा बोधपट… “डॉ. रखमाबाई” लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.