माझे बाबा लय भारी

0
887

स्टार अभिनेता रितेश देशमुखच्या छोट्या पडद्यावरील आगमनाची इंडस्ट्रीतप्रेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता आहेतितकीच उत्सुकता रितेशच्या घरीही आहे. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या विकता का उत्तर‘ या गेम शोमध्ये रितेशला पाहून त्याचा मुलगा रियानही भलताच खुश झाला. बाबांना टीव्हीवर पाहून माझे बाबा लय भारी‘ अशीच त्याची प्रतिक्रिया होती. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुखनं ट्विट केल्यामुळे विकता का उत्तरची रितेश घरी असलेली उत्सुकता सर्वांना कळली.

स्टार प्रवाहवरील विकता का उत्तर हा अनोखा गेम शो ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या एपिसोडपासूनच या गेम शोला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. ट्विटरवरही विकता का उत्तर ट्रेंडिगमध्ये आहे. महाराष्ट्रात आणि टीव्ही इंडस्ट्रीत असलेली या गेम शोची उत्सुकता रितेशच्या घरीही तितकीच आहे. रितेशच्या छोट्या पडद्यावरचं पदार्पण यशस्वी ठरलं आहे.

छोटा रियान घरी बसून टीव्हीवर विकता का उत्तर पहात असल्याचा फोटो जेनेलियाने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच जेनेलियाने माझे बाबा लयभारी‘ ही रियानची प्रतिक्रियाही लिहिली आहे. असे म्हणत ट्विट केले आहे. रियानचा हा मजेशीर फोटो रितेशलाही आवडला.  ट्विटरवर या फोटोचं रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांकडून कौतुक झालं.