Nag Panchami Marathi Article

0
297

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नामदेवांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली, असे मानले जाते. तेव्हापासून ‘नागपंचमी ‘ हा सण साजरा केला जातो.

या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो. अशी रूढ भारतात आहे. या दिवशी ज्या स्त्रियांना भाऊ नसतो, त्या स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात. व त्याला दूध – लाह्या यांचा प्रसाद देखील अर्पण करतात. पावसाळ्यात नागदेवता ही बळीराजाला शेतात खूप मदत करते. म्हणूनच नागोबाला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणतात.

मराठी सन्मानच्यासर्व प्रिय वाचकांना नागपंचमी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा