What does friendship day means sower ?

0
178

मैत्री तुझी – माझी
अख्ख्या जगात लय भारी…
थोडीशी हसरी – थोडीशी लाजरी
पण आपलीच यारी जाम भारी…..🌹🌹

‘फ्रेंडशिप ङे ‘ म्हणजे नेमकं काय बुवा ??

मित्रांनो दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील दुसर्या आठवड्यात हा फ्रेंडशिप ङे तरुणाई साजरा करतात.
‘ फ्रेंडशिप ङे ‘ म्हणजेच आपल्या मनातील मैत्री व्यक्त करण्याचा दिवस. मित्र, सवंगडी, सखा, दोस्त, लंगोटी यार अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा असतो तो आपला सोबती. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुद्ध असतं, तेव्हा साथ देतो तो असतो हा मित्र…आपल्या सुख – दुःखात सोबत कुणी असो वा नसो, पण तो मात्र हमखास उभा असतो, तो असतो हा मित्र. थट्टा, मस्करी, राग, रुसवा, गोडी- गुलाबी असं सर्वकाही या मैत्रीमध्ये सामावलेलं असतं. खऱ्या मैत्रीला व्यक्त करण्यासाठी शब्दांची देखील गरज नसते. ती तर भावनांमधूनही आपल्या सच्च्या दोस्ताला समजून येते.

मित्रांनो, मैत्री ही तुमची – आमची असो किंवा कृष्ण आणि सुदामा यांची असो. मैत्री हे एक अत्यंत गोंडस नातं आहे. देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक नात्यांपैकी मैत्रीचं नातं हे सर्वांत अनमोल आहे. मैत्री ही एका सुंदर रेशीम धाग्याप्रमाणे असते. निस्वार्थी , प्रेमळ अशा भावनेनं निर्माण होते ती मैत्री. असे हे मैत्रीचे नाते खट्याळ, खोडकर, भावुक, बिनधास्त असलेलं जगातील सर्वश्रेष्ठ नातं आहे.

तरुणाई आपला हा ‘फ्रेंडशिप ङे ‘ रंगीबेरंगी बँङ बांधून, गिफ्ट्स देऊन आपल्या मनातील मैत्रीची भावना व्यक्त करतात.