Bigg Boss Marathi Season 2 मधील स्पर्धक माधव देवचके हे गणेशोत्सवाविषयी काय बरं म्हणतात?

0
500

Colors Marathi वाहिनी वरील आपला मराठी Bigg Boss Marathi Season 2 मधील माधव देवचके यांनी सर्वप्रथम मराठी सन्मानच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

माधव यांनी सांगितले की, गणपती बाप्पा त्यांना खूप आवडतो. त्यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा स्थानापन्न करण्याची प्रथा ही साठ वर्षांपासून सुरू आहे. तसेच त्यांनी सांगितले की, माझी आई गणपती बाप्पाला आपला भाऊ मानते. त्यामुळे मी गणपती बाप्पाला ” मामा ” असे संबोधतो.

माधव देवचके यांनी सांगितले की, यावर्षी गणपती बाप्पाच्या ङेकोरेशन ची तयारी आपण बिग बॉस मराठीच्या Grand Finale मध्ये व्यस्त असल्याने करायला मिळालीच नाही. त्यामुळे संपूर्ण ङेकोरेशन हे संपूर्ण परिवारातील सदस्यांनी एकत्रितपणे केले आहे. माधव हे दरवर्षी शाङूचा इकोफ्रेंडली गणपती बाप्पा स्थानापन्न करतात. यामुळे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपला हातभार लागतो. तसेच त्यांनी सर्वांना दरवर्षी नियमितपणे शाङूचा इकोफ्रेंडली गणपती बाप्पा स्थानापन्न करण्याचा एक आदर्श संदेश दिला.

अशाप्रकारे Bigg Boss Marathi Season 2 मधील रोखठोक, धाडसी व्यक्तिमत्त्व माधव देवचके यांनी गणेशोत्सवा बद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

प्रियांका पवार