मराठी सिनेसृष्टीतील मनमोहक मराठमोळे अभिनेते सुशांत शेलार गणेशोत्सवाविषयी काय बरं म्हणतात??

0
235

मराठी सिनेसृष्टीतील मनमोहक मराठमोळे अभिनेते सुशांत शेलार गणेशोत्सवाविषयी काय बरं म्हणतात??

सुशांत शेलार यांनी सर्वप्रथम मराठी सन्मानच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सुशांत यांनी सांगितले की, आपण पूर्वी जेथे राहत होतो, तेथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत होतो. परंतु आता नवीन घरी राहायला आल्यापासून येथे आम्ही बाप्पाला स्थानापन्न केले आहे. आमच्या नवीन घरी बाप्पाच्या आगमनाचे हे प्रथमच वर्ष आहे.

त्याचप्रमाणे सुशांत शेलार यांनी सांगितले की, बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी आम्ही घरीच एकत्रितपणे केली आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. परंतु हा बाप्पा निरोप घेऊन जाताना मन अक्षरशः गहिवरून येते. असा हा बाप्पा सर्वांचाच लाडका आहे.

अशाप्रकारे अभिनेते सुशांत शेलार यांनी आपले बाप्पा विषयी मत व्यक्त केले आहे.