Telli Gallicha Raja (Abhijeet Kosambi)

0
111

प्रत्येक भागाच्या/एरियाच्या गणपतीचे खास वैशिष्ट्य असते आणि असाच एक गणपती म्हणजे ‘तेली गल्लीचा राजा’. तेली गल्लीचा राजा नवासाला पावतो याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आपल्या या गणपती बाप्पाची अर्थात राजाची महती सांगणारे गाणे ‘तेली गल्लीचा राजा, आराध्य माझा’ आज लाँच झाले. मेघना दळवी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या शब्दांना गायक अभिजीत कोसंबी यांनी आवाज दिला आहे अणि जयदीप फिल्म्स प्रॉडक्शन ने निर्मिती केली आहे .

आज या गाण्याचे लाँच मुंबईतील दि लीला हॉटेल येथे पार पडले. यावेळी मा. श्री. मनोहर जोशी, खासदार मा. श्री. विनायक राऊतसाहेब, दि लीला हॉटेलचे प्रेसिडेंट विनोद देसाई, शिवसेना सेक्रेटरी मा. श्री. संजय राणे, गायक अभिजीत कोसंबी, गीतकार मेघना दळवी, निर्माते रंगनाथ पाचंगे, अभिनेते अरुण नलावडे, संगीतकार अमर देसाई, कोरिओग्राफर संतोश भांबरे कार्यकारी निर्माते संभाजी कांबळे निर्मिती व्यवस्थापक धनंजय गारळे आदी मान्यवर उपस्थित होते .

या गाण्याच्या शब्दांचा, संगीताचा आणि सुरेल आवाजाचा आनंद प्रत्येक गणेश भक्ताला आता घेता येणार आहे आणि तसेच या गाण्यातून ‘तेली गल्लीचा राजा’चे महत्त्व आता प्रत्येकाला समजेल .