मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक तसेच Planet मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बद्रापूरकर हे गणेश चतुर्थी बद्दल काय म्हणतात ?

0
87

अक्षय बद्रापूरकर यांनी सर्वप्रथम मराठी सन्मानच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सालाबादप्रमाणे या ही वर्षी अक्षय यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

गणपती बाप्पाने आपल्याला प्रत्येक कार्यात साथ दिली. गणपती बाप्पाचा आशिर्वाद सदैव असाच आपल्या सोबत राहो, हीच मनापासून बाप्पा जवळ प्रार्थना… तसेच गणेशोत्सवा निमित्त सर्वांच्या घरी पाहुण्यांच्या स्वरूपात आनंदाची लहर येते. असा हा विघ्नहर्ता सर्वांच्याच आयुष्यात नवीन रंग भरून जातो.

अशाप्रकारे दिग्दर्शक अक्षय बद्रापूरकर यांनी गणेशोत्सवाविषयी आपले विचार व्यक्त केले आहे.