आपल्या लाडक्या बाप्पा विषयी मराठमोळी मनमोहक अभिनेत्री मिताली मयेकर काय म्हणतात बरं ??

0
405

मिताली मयेकर ही म्हणते की, गणपती बाप्पासोबत आपली खूपच वेगळी जवळीक आहे. लहानपणापासूनच बाप्पा खूप खूप आवडायचे. त्यामुळे बाप्पाला घरी स्थानापन्न करण्याची आपली इच्छा पूर्ण झाल्याने भरपूर आनंदी आहे. माझे प्रत्येक महत्त्वाचे काम हे मंगळवारीच ठरून येते. मग हा बाप्पाचा चमत्कार असावा, असेच वाटते.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आपल्या घरी पाच दिवसांचा बाप्पा आहे. बाप्पाच्या आगमनानंतर पहिल्या दिवशी रात्रीच जागरण ठेवतात. तेव्हा आपले स्नेही, मित्र – मंडळी यांच्या सोबत खूप धम्माल करत जागरणाचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे मिताली मयेकर हिने असे देखील म्हटले की, पुढील वर्षी मी माझ्या बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी कदाचित आपल्या घरी नसेल. परंतु कदाचित या शब्दामागील कारण मी सध्या सांगू शकत नाही. ते लवकरच सर्वांना समजेल.

अशाप्रकारे मिताली मयेकर या सुंदर अभिनेत्रीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पा बद्दल आपले मत व्यक्त केले आहे.