Bigg Boss Marathi Season 1 च्या विजेत्या उत्कृष्ट नृत्यांगना Megha Dhade गणेशोत्सवाविषयी काय बरं म्हणतात ?

0
96

Bigg Boss Marathi Season 1 च्या विजेत्या Megha Dhade यांनी गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पा विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. मेघा यांच्या आई- वडिलांच्या घरी गणपती बसवण्याची प्रथा सुरूच होती. तीच प्रथा सोबत घेऊन त्यांनी सासरी देखील गणपती स्थापन करण्याची प्रथा सुरूच ठेवली.

साधारणपणे पाच वर्षापासून त्या आपल्या घरी पाच दिवसांचा बाप्पा स्थानापन्न करतात. संपूर्णपणे इकोफ्रेंडली बाप्पा सुंदर, विविध रंगीबेरंगी, सु सुवासिक फुलांच्या सजावटीत आपल्या बाप्पाला त्यांनी स्थापन केले होते. तसेच बाप्पाचे संपूर्ण ङेकोरेशन हे मेघा यांनी आपल्या परिवारासह एकत्रित मिळून केले आहे. बाप्पाची आराधना करण्यातच खरी भक्ती आहे, असेही त्या म्हणाल्या. गणेशोत्सवाविषयी मेघा यांनी आपले खूपच सुंदर विचार व्यक्त केले आहेत.

त्या म्हणतात की, गणेशोत्सवा निमित्त बाप्पाचे घरी आगमन होते. त्यामुळे पाहुण्यांनी घर अगदी बहरून जाते. बाप्पाच्या आगमनाने घराला एक नवीन पालवी फुटते. बाप्पाची सेवा करण्यामुळे भक्तीचा मधुर आनंद अनुभवता येतो. गणपती बाप्पाच्या नावानेच आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात होते आणि बाप्पाच्या नावानेच आपल्या कामाचा शेवट होतो, असेही त्या म्हणाल्या. गणपती बाप्पाच्या आगमनाने विघ्न दूर होतात. तसेच आपल्या कामाला गती प्राप्त होऊन यश मिळते.

अशा सुंदर आणि गोङ शब्दांत मराठमोळ्या नृत्यांगना मेघा यांनी आपल्या बाप्पा विषयी कौतुक केले आहे.