‘अनान’ Synopsis

0
2249

रोहन थिएटर्स निर्मित ‘अनान’ हा मराठी चित्रपट येत्या 22 सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राजेश कुष्टे यांनी केले आहे.

रोहन थिएटर्स :

मराठीत हल्ली बऱ्याच नवीन निर्मितीसंस्था पाऊल ठेवताना दिसतात यापैकीच एक निर्मितीसंस्था म्हणजे रोहन थिएटर्स… मराठी सिनेसृष्टीत सातत्याने होणारे नवनवीन प्रयोग आणि त्यांना प्रेक्षकांचा मिळणारा उत्कृष्ट प्रतिसाद या नवीन सिनेसंस्थांना मराठीत असे प्रयोग करण्यास प्रोत्साहीत करतात. अशाच एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा अनान या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन थिएटर्स मराठीत घेऊन येत आहेत.

हेमंत भाटिया (निर्माते) / Hemant Bhatia (Producer) :

काही जाहीरातींसाठी अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन केल्यानंतर आता हेमंत भाटिया चित्रपटांच्या निर्मितीसाठी सज्ज झाले आहेत. अनान या चित्रपटाच्यानिमित्ताने हेमंत भाटिया मराठी सिनेसृष्टीत एक निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा हेमंत भाटिया यांची असून कला दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे.

रौनक भाटिया (निर्मात्या) / Raunaq Bhatia (Producer):

रौनक भाटिया यांनी या चित्रपटासाठी निर्मात्या म्हणून काम पाहिलेलं आहे.

राजेश कुष्टे (दिग्दर्शक) / Rajesh Kushte (Director):

नटरंग, आयना का बायना, डब्बा ऐसपैस यासारख्या सिनेमांमधून आपलं योगदान दिलेले राजेश कुष्टे अनान या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. गेली 15 वर्ष नाटक, टेलिविजन आणि चित्रपटविश्वाशी ते निगडीत आहेत.

राजेश कुष्टे – मुकेश जाधव :

दिग्दर्शनाबरोबरच अनान या चित्रपटासाठी राजेश कुष्टे यांनी पटकथा – संवाद ही लिहिले आहेत ज्यात त्यांची सोबत मुकेश जाधव यांनी केली आहे.

या चित्रपटात प्रार्थना बेहरे आणि ओमकार शिंदे ही जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर यांच्याबरोबर सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, उदय नेने, शिल्पा तुळसकर, यतिन कार्येकर, उदय सबनीस, स्नेहा रायकर, राजेंद्र शिसतकर, प्राजक्ता माळीबरोबरच इतर कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.

सौरभ – दुर्गेश / Saurabh – Durgesh (Music Director) :

संगीतकारांमध्ये सध्या एक से भले दो या गणितावर संगीत दिग्दर्शन केलं जात आहे. याच यादीत अनान च्या निमित्ताने अजून एका संगीतकार जोडीचे नाव सामिल झाले आहे. ही जोडी म्हणजे सौरभ – दुर्गेशची… जाहीरातींसाठी संगीत देणाऱ्या या जोडीने चित्रपटातील पदार्पणातच आपलं नाण चोख वाजवून दाखवलं आहे.

राजेश कुष्टे (गीतकार) / Rajesh Kushte (Lyricist):

दिग्दर्शन आणि पटकथा संवादाबरोबरच आपल्या लेखणीचं कौशल्य दाखवत राजेश कुष्टे यांनी आपल्या सिनेमाला साजेशा गाण्यांचं लेखन ही स्वत: केलं आहे.

या गाण्यांची माहिती खालीलप्रमाणे :

१) ‘गंधी सुगंधी’

गायक – सोनू निगम, आनंदी जोशी

२) ‘एक सूर्य तू’

गायक – सौरभ शेट्ये, आनंदी जोशी

३) ‘काहे तू प्रित जगायी’ – गझल

गायक – पूजा गायतोंडे

4) ‘तांडव’

गायक –  रवींद्र साठे

5) ‘नारनशिली’

गायक – राजेश कुष्टे