“Girlfriend” Marathi Movie Review

0
1275

गर्लफ्रेंड  म्हणजे प्रेयसी, प्रेमिका. जी प्रत्येकालाच हवीहवीशी असते. आयुष्याच्या वळणावर एका साथीदाराची साथ हवी असते. गर्लफ्रेंड जी आपल्या सुखदु:खात साथ निभावते. जिला घेऊन आपण मित्रांमध्ये मिरवतो. अशी असावी गर्लफ्रेंड. दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी गर्लफ्रेंड नसताना भकास असलेले आयुष्य आणि गर्लफ्रेंड भेटल्यानंतर बदललेले रंगीन आयुष्य याची संकल्पना अगदी उत्कृष्ट रीतीने मांडली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत नचिकेत प्रधान (  अमेय वाघ  ) आलिशा नेरूरकर  ( सई ताम्हणकर ) हे कलाकार आहेत.

26 जुलै 2019 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून गर्लफ्रेंड आणि तिच्या सोबतचे ते अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी सर्वांनी  या चित्रपटाचा आनंद घ्यावा.

गर्लफ्रेंडया चित्रपटात नचिकेत प्रधान  ( अमेय वाघ ) हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. जो अगदी साधासरळ मुलगा असतो. त्याच्या साध्या आणि सालस स्वभावामुळे त्याला गर्लफ्रेंड नसते. त्यामुळे त्याला फॅमिली ऑफिस असे सगळीकडे अपमानास्पद बोलणे  ऐकून घ्यावे लागते.  तर हा हताश झालेला नचिकेत फेसबुकच्या माध्यमातून पायल मेहता या सुंदर मुलीचे फोटो वापरून तिच्या नावाचे बनावट अकाऊंट बनवून ती मुलगी आपली आपली गर्लफ्रेंड असल्याचे तो सर्वांना सांगतो. आपल्या गर्लफ्रेंडचे नाव आलिशा नेरूरकर असून ती यू.एस.. मध्ये कॅलिफोर्निया येथे ग्राफिक ङिझायनिंग चे काम करते. अशी माहिती देखील तो सर्वांना सांगतो. तर दुसरीकडे नचिकेतला गर्लफ्रेंड आहे, म्हणून त्याचे मित्र, फॅमिली,  ऑफिसमधील सर्वजण अगदी निश्चिंत होतात. तर एक दिवस अचानक नचिकेतच्या ऑफिसमध्ये त्याची तीच फेसबुकची गर्लफ्रेंड आलिशा नेरूरकर  ( सई ताम्हणकर ) येते. तिला आपल्या मित्राकडून हा घडलेला सर्व प्रकार समजतो. तर  काय नचिकेत स्वप्नांतील त्याची गर्लफ्रेंड आलिशा म्हणजेच फेसबुकवरील सत्य स्वरूपातील पायल मेहता ही खरंच नचिकेतची   गर्लफ्रेंड होणार का? नचिकेतचे गर्लफ्रेंडचे स्वप्न सत्यात उतरेल का? आलिशा ही नचिकेतची गर्लफ्रेंड आहे, हे माहित झाल्यापासून नचिकेतची फॅमिली, त्याचे फ्रेंड्स आणि ऑफिसमधील सहकार्य याचा आनंद हा शेवटपर्यंत टिकून राहील का?

चित्रपटामध्ये (कविता  लाङ ) या नचिकेत प्रधानच्या  आई आहेत. तर  (  यतीन कार्येकर ) हे नचिकेतचे बाबा आहेत. ( तेजस बर्वे ) रोहन याने नचिकेतच्या भावाची भूमिका केलेली आहे. ( उदय नेने ) अद्या आणि  (सुयोग गोऱ्हे ) सँङी हे नचिकेतचे मित्र आहेत. श्वेता  ( रसिका सुनील ) ही नचिकेतला ऑफिसमध्ये त्याच्या सोबत असते. तर कावेरी  ( ईशा केसकर) हिने अद्याच्या बायकोची भूमिका साकारली आहे. चित्रपटातीलनच्या गॉट गर्लफ्रेंडआणिकोडे सोपे थोडेही दोन्ही गाणी खूपच सुंदर आहेत. तसेचलव song ” आणिकोरीदोकोरीदोही गाणी देखील खूपच आकर्षक करणारी आहेत. संगीतकार त्रुषीकेशसौरभजसराज आणि क्षितिज पटवर्धन यांचे गीत हे अतिशय उत्तम आहे.

या चित्रपटातून फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून  बनावट अकाऊंट बनवणे, त्या व्यक्तीचे फोटो वापरणे . असे गैरप्रकार करणे,  हा खरंतर गुन्हा आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा समाजातील नावलौकिकाला तङा   जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आजच्या काळातील मुलांना गर्लफ्रेंड असणे, हे काही गैर नाही. परंतु आपल्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या जवळील लोकांना कोणत्याही वेदना होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. हे देखील आपल्याला या चित्रपटातून समजते. त्यासाठी  सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

3.5 / 5

:- प्रियांका पवार.