दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या “वेलकम होम” या चित्रपटाची संकल्पना ही खूपच वेगळी आहे. स्त्री वर्गासाठी त्यांचं ‘माहेर’ हे त्यांचं घर असतं? की ‘सासर ‘ हे त्यांचं घर असतं. आपल्या हक्काच्या शोधात असलेल्या स्त्रियांचं विश्व हे चार भिंतीतचं असतं, की चार भिंतीच्या पलीकडेही स्त्रीचं स्वतःचं असं विश्व असतं.
21 व्या शतकातील स्त्री ही स्वावलंबी आयुष्य जगू शकते. कोणत्याही माणसाच्या ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते.
त्यामुळे निश्चितच हा चित्रपट समाज सुधारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. येत्या 14 जून 2019 रोजी “वेलकम होम हा चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘वेलकम होम ‘ या चित्रपटात मीनू (मृणाल कुलकर्णी ) यांनी एका स्वावलंबी व उच्चशिक्षित स्त्री ची भूमिका साकारली आहे. 21 व्या शतकातही त्यांचे नात्यांना सांभाळून घेणे, समंजस व सालस स्वभाव हे अतिशय उत्तम आहे. स्पृहा जोशी यांची बिनधास्त आणि धाडसी पत्रकाराची भूमिका ही वाखाणण्याजोगी आहे. काळजीपूर्वक मैत्री निभावणारा सुरेश (सुमित राघवन ) हा मिनूचा चांगला मित्र आहे. तसेच लग्नानंतर 12 वर्षांनी कायमची माहेरी निघून आलेली मिनू हिला काही कमी पडू न देता तिची काळजी घेणारे आप्पा (मोहन आगसे ) यांची देखील भूमिका सुंदर आहे. तसेच आपल्या बहिणीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी तिला खंबीरपणे आधार देणारे प्रशांत (सुबोध भावे ) यांचीही भूमिका उल्लेखनीय आहे. चित्रपटाची संकल्पना ही वेगळ्या पद्धतीने मांडली असली, तरीही आजच्या पिढीतील स्त्रियांच्या उत्कर्ष होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एकत्र कुटुंबात वावरताना प्रत्येक स्त्रीने फक्त स्वतःचा विचार करायचा, की आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखांची आहुती द्यायची याची सांगड येथे उलगडते.
अभिनेता सुमित राघवनचे सुमधूर बंगाली गाणं, कोणत्याही वाद्यांच्या साथसंगतीशिवाय खूप सुरेख आहे. चित्रपटातील मीनू (मृणाल कुलकर्णी )यांनी पतीवर विसंबून न राहता वेगळे राहण्याचा जो निर्णय घेतला आहे, काय समाज हा निर्णय स्वीकारेल का बरं ??? मीनूचे आई – वडिल अशा परिस्थितीत तिची साथ देतील का?? आजच्या पिढीतील स्त्री वर्गाने स्वतःच्या उच्च शिक्षणाचा किंवा उच्च पदावर नोकरी करत असतानाही परिवाराच्या जबाबदारीतून हात बाजूला काढू नये. हे आपल्याला या चित्रपटातून शिकायला मिळते. यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा. 21 व्या शतकातील बदलती आधुनिक शैली व त्याविरुद्ध होणारे मतभेद यांचे निर्मूलन कोणत्या प्रकारे करावे, याचे आपल्याला मार्गदर्शन मिळते.

4/5

:- प्रियांका पवार.