“Smile Please” Marathi Review

0
912

‘Smile Please’ या चित्रपटाच्या नावातच जाणवते की, फोटोग्राफी, कॅमेरा यासंबंधी चित्रपटाची संकल्पना असावी. दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी फोटोग्राफीचं असलेलं Passion जिद्द, मेहनत,  चिकाटी . गुणांच्या आधारावर स्वतःच्या उत्तम Photography ची रचना मांडली आहेया चित्रपटातील फोटोग्राफर ची व्यक्तिरेखा सादर केलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा अभिनय खरंच खूप उत्कृष्ट आहे. हा चित्रपट 19 जुलै 2019  ला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘स्माईल प्लीजया चित्रपटामध्ये नंदिनी  ( मुक्ता बर्वे  ) ह्या एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. आपल्या करिअर मध्ये प्रामाणिकपणे रांत्रदिवस मेहनत करून त्या प्रसिद्धी मिळवतात. परंतु नुपूर ( वेदश्री महाजन ) या  आपल्या मुलीसोबत नंदिनी  यांचे सूत काही जुळत नाही.

 शिशिर ( प्रसाद ओक ) हे एक उत्तम दिग्दर्शक असतात. पण तरीही नंदिनीसोबत त्यांचे का पटत नाही आणि दोघेही वेगळे का राहतात,  याचे कोडं मात्र आढेवेढे घातलेलं आहे. आप्पा  ( सतीश अळेकर ) यांनी नंदिनीच्या बाबांची भूमिका खूपच सुंदर केली आहे. ज्योती  (तृप्ती खापकर ) हिने नंदिनी यांच्या घरातील मोलकरीणचं काम चोख केलं आहे. आपल्या  नंदिनी ताईंची मनापासून काळजी घेणारी ज्योती ही अगदी लहान बहिणीप्रमाणे वाटते. नुपूर  (  वेदश्री महाजन ) ही देखील आपली आई नंदिनीप्रमाणे जिद्दी असते. चित्रपटामध्ये स्वतःच्या  वैयक्तिक आयुष्यापेक्षा व्यावसायिक वाटचालीकङे जास्तीत जास्त लक्ष दिले आहे, हे एक आदर्श, यशस्वी  व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण आहे.

 दिग्दर्शक विक्रम फडणीस यांची चित्रपटाची संकल्पना ही अतुलनीय आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली नंदिनी, जिची स्मरणशक्ती दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ङिमेंशिया या घातक आजाराने ग्रस्त असलेली आप्पांची लाडकी नंदू कायमस्वरूपी अशीच राहिल का?? नपा म्हणजेच नुपूर आपली आई नंदिनी हिला कधी तरी समजून घेईल का?? आप्पांनी ज्या मुलाला काही दिवस घरी राहण्यासाठी बोलावलं आहे. तो विराज  (  ललित प्रभाकर ) येण्यामुळे नंदिनीच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का?? ङिमेंशियाच्या कचाट्यात सापडलेल्या नंदिनीच्या फोटोग्राफीचा  असाच शेवट होणार का?? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावतात.

चित्रपटातीलश्वास देआणिअनोळखीहे रोहनरोहन यांचे संगीत उत्कृष्ट आहे. जगण्याची प्रेरणा देणारे असे या संगीताचे बोल आहेत. त्याचप्रमाणेचल पुढे चल तूहे अप्रतिम संगीत हर्षद खानविलकर, महेश मांजरेकर, अदिती गोवित्रीकर, मृणाल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, संगीता घाटगे, पुष्कर श्रोती, सुप्रिया पिळगावकर, उर्मिला मातोङकर अवधूत गुप्ते, महेश वाडकर, स्वप्नील गोडबोले, उमेश शिंदे  या नामांकित व्यक्तींनी गायले आहे. त्यामुळे या संगीतातील प्रत्येक शब्द हा उत्स्फूर्ती निर्माण करतो. आपल्या नवीन पिढीला या चित्रपटातून आव्हानांना  नाही ङगमगता सामोरे  कसं जावं, आपल्या स्वप्नांना आपणच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतो. स्वतःची ओळख या जगात बनवायची असेल तर अनेक संकटावर मात करावी लागते. वेळप्रसंगी स्वतःचा कोलमङता विश्वास देखील नियंत्रणात आणावा लागतो. हे सर्व आपल्याला या चित्रपटात समजते. स्वतःच्या  स्वप्नांवरील आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या फोटोग्राफी क्षेत्रांत आव्हानांना तोंड देत आपली ओळख बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या या ध्येयवेङया फोटोग्राफरचा प्रवास सर्वांनी अनुभवावा. यासाठी सर्वांनीस्माईल प्लीज  हा चित्रपट आवर्जून पाहावा.

4.5/5*

:- प्रियांका पवार.