‘Zindagi Not Out’ Title Song Lyrics (Marathi)
छापा काटा सोड आता
ही खेळाची रीत रे
स्पर्धा ही तर तुझी तुझ्याशी
हार असो वा जीत रे
जगून घे तू स्वप्न उद्याचे …स्वप्न उद्याचे
तरी असू दे भान स्वतःचे … स्वतःचे
धाव तू भरधाव आहे जिंदगीsss
जिंदगी नॉट आऊट … जिंदगी (x २)
हसता हसता छातीवरती
झेलून घे तुफानाला
नजरेमध्ये नजर रोखुनी
उत्तर दे आव्हानाला
अंधारताना भीती कशाची
मशाल आहे हाती
आता यशाची
धाव तू भरधाव आहे जिंदगीsss
जिंदगी नॉट आऊट … जिंदगी (x ४)