“WhatsApp Love” Marathi Movie Review

0
808

WhatsApp Love हा चित्रपट हल्ली सर्वत्र सोशल मीडियाचा होणारा जास्तीत जास्त वापर तसेच त्याचे दुष्परिणाम आणि त्याचा नात्यांवर होणारा दुष्परिणाम इ. गोष्टींवर आधारित आहे. दिग्दर्शक हेमंत कुमार महाले यांची चित्रपटाची संकल्पना ही अतिशय उत्कृष्ट आहे. चित्रपटातील कलाकारांनी मनमोहक अभिनय सादर केले आहेत. सोशल मीडियावर आधारित असलेला हा चित्रपट 12 जूलो 2019 ला प्रदर्शित होणार आहे .

या चित्रपटात WhatsApp च्या आकर्षणातून जङलेलं प्रेम, उत्सुकता, बालिश मन यांमधून नकळतपणे मनात निर्माण झालेल्या भावना या सर्व गोष्टींची अगदी योग्य प्रकारे मांडणी केली आहे. चित्रपटातील आदित्य देशमुख ( राकेश बापट ) यांनी एका पतीची भूमिका निभावली असून WhatsApp च्या वापरातून ते विवाहित असूनही मोनालिसा ( सरेशफार ) च्या प्रेमात पडतात. Message च्या स्वरूपात बोलणारी मोनालिसा ही आदित्य देशमुख यांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडते. अनघा देशमुख ( अनुजा साठे ) यांनी एका आदर्श प्रेमळ पत्नीची भूमिका निभावली आहे. मोनालिसा (सरेशफार ) ने एका सौंदर्यवती युतीची भूमिका रेखाटली आहे. रूचा ( पल्लवी शेट्टी ) हिने आदित्य यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या असिस्टंटची भूमिका या चित्रपटात रेखाटली आहे. विवाहित असूनही एका दुसर्‍या युवतीच्या प्रेमात पङणे हे गैर आहे. त्याचप्रमाणे इतर लोकांचे ऐकून आपल्या नात्यांत वाद निर्माण करणे, हे देखील अतिशय चुकीचे आहे. तसेच आपल्या पतीची मनापासून काळजी घेणे, ही संकल्पना देखील खूप छान आहे .

WhatsApp Love या चित्रपटातून Social media चा जास्तीत जास्त वापर केल्याने नात्यांमधील दुरावा, गैरसमज, चिडचिड यामुळे नाती तुटतात. त्यामुळे Social media ला कमी महत्त्व देऊन नात्यांना जपावे, असा संदेश दिग्दर्शक हेमंत कुमार महाले यांनी दिला आहे. चित्रपटातील ‘जवळ ये ना जरा’ आणि ‘ये शोना’ ही साहिल सुलतानपुरी, विश्वजीत जोशी, नितीन शंकर यांची गाणी अतिशय मनमोहक आहेत. त्याचप्रमाणे ‘मेरे मोलाह गुनाह मेरे माफ कर दे ‘ ही सुमधूर कवाली देखील उल्लेखनीय आहे. चित्रपटातील आदित्य देशमुख हे WhatsApp च्या वापरातून आपली पत्नी अनघाच्या नकळत मोनालिसा सोबत बोलायचे. सौंदर्यवती मोहक अप्सरा मोनालिसा च्या मोहात पडलेले आदित्य देशमुख हे आपला सुखी संसार वाऱ्यावर सोडून मोनालिसाच्या मागे जातील का??? आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अनघा चे मग काय होणार??? असे प्रश्न सतावतात.
यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजनात्मक ठरणार. सोशल मीडियाला नात्यांपेक्षा जास्त महत्त्व नाही देणे. नाती ही कोमल भावनांनी गुंफलेली असतात. त्यामुळे त्यांना वेळेवरच सावरणे हे नेहमीच योग्य असते. Social media हे फक्त काही क्षणभंगुर असते. परंतु आपली नाती ही मात्र आपल्यासोबत आयुष्यभराची साथ निभावतात. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहावा .
3.5/5
:- प्रियांका पवार.