बिईंग मराठीचा प्रेरणादायी प्रवास……..

0
736

आज सोशल मीडियावरील मराठी मनोरंजन विश्वात चर्चेत असलेले फेसबुक पेज म्हणून ‘बिईंग मराठी’ ओळखले जाते. सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टीतील कोणत्याही मराठी चित्रपट, वेब सिरीजचे प्रमोशन ‘बिईंग मराठी’ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणायला गेलं तर आज ही सर्व ताकद सोशल मीडियाची जरी असली, तरी त्यामागे बिईंग मराठीच्या  सर्व टीमची मेहनत आहे हे देखील मान्य करायला हवे.
चार वर्षापूर्वी विदर्भातून पुण्यात इंजिनिअरिंग साठी आलेल्या अक्षय धंदर या युवकाच्या मनात या पेजची संकल्पना तयार झाली आहे. मग त्यानेच सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन हे पेज चालवायला सुरुवात केली.
सध्याच्या स्थितीत सोशलमीडियावर राजकीय क्षेत्राविषयी काम करणारी अनेक न्युज पोर्टल, न्युज चॅनेल्सची पेजेस आहेत. त्यामुळे आपण लोकांपर्यंत एखादा वेगळा विषय घेऊन जायला हवा, की ज्यातून व्यावसायिक सोबतच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बॉलिवूडच्या झगमगाटात मराठी सिनेसृष्टी कुठेतरी मागे पडत असल्याचे वैभव आणि त्याच्या टीमच्या लक्षात आले. त्यामुळे मराठी सिनेक्षेत्राची माहिती सोशल मीडियाव्दारे अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचली पाहिजे ही बाब ध्यानात घेऊन ‘बिईंग मराठी’ सुरु झाले. सुरुवातीला काही कंटेन्ट राईटर, डिझाईनर मित्रांना सोबत घेऊन कामास सुरुवात केली. मोजक्या शब्दातील कंटेन्ट, व्हिडिओ लोकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला.
जस-जसा नेटिझन्सचा या पेजला प्रतिसाद मिळू लागला तसा ‘बिईंग मराठी’ टीमचा आत्मविश्वास देखील विश्वास वाढला. अनेक मराठी फिल्म निर्माते, दिग्दर्शक फिल्म वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बिईंग मराठीकडे येऊ लागले. बघता-बघता या पेजने अडीच लाख लाईक्सचा टप्पा यशस्वीरित्या पार केला केला. ‘बिईंग मराठी’ स्थिर होत असतांनाच, काही तांत्रिक चुकांमुळे फेसबुकने हे पेज बंद केले. अडीच लाख लाईक्सचे हे पेज एकाएकी बंद पडल्याने टीमने केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले.  टीममधील सर्व मेंबर निराश झाले परंतु अक्षयने हताश न होता पुन्हा एका नव्या जोमाने हे पेज सुरु करण्याचा निश्चय केला. खरं तर पुन्हा एकदा शुन्यातून सुरुवात करणे ही गोष्ट सोपी नव्हती परंतु सर्वच सदस्यांच्या सहकार्याने आणि बिईंग मराठीवर प्रेम करणाऱ्या नेटिझन्सच्या प्रतिसादामुळे या पेजने मोठी झेप घेतली. आजच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात वेगात वाढणाऱ्या ऑनलाइन चित्रपट प्रमोशन करणाऱ्या पेजपैकी बिईंग मराठी एक नाव आहे. सध्या बिईंग मराठी या पेजला अकरा लाखाहून अधिक लाईक्स असून या पेजचे राज्याच्या काना-कोपऱ्या लाखो फॉलोअर्स आहेत. या पेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत मराठी चित्रपट, वेबसीरीज,  सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा  प्रसार करण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे.
या पेजला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पुढील पाऊल म्हणून बिईंग मराठी मीडिया प्रा.लि.कंपनींची स्थापना या युवकांनी केली आहे. ज्यात मुंबई, पुणे, कार्यालयात काम करणाऱ्या १० हून अधिक मित्राचा समूह आहे. ‘बिइंग मराठी मीडिया’ आता एक कंपनी झाली असून, व्हिडिओ प्रमोशन, सोशल मीडिया प्रमोशन, सर्च इंजिन ऑप्टोमायजेशन, ऑनलाईन मतदान, ऑनलाइन फोरम चर्चा, विविध फॅन क्लब आणि फोटो शेअरिंग आदी तंत्राद्वारे ‘बिंईग मराठी’ काम करीत आहे.
‘बिंईग मराठी’ पेजचे काही स्वतःचे नियम देखील आहेत. या पेजवरुन आर्थिक आमिष असून देखील कोणत्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे प्रमोशन केले जात नाही. जातीय-धार्मिक वाद होतील असा कोणताही कंटेट प्रसिध्द केला जात नाही. तरुणाईला व्यसनाधिनते कडे वळविण्याऱ्या कोणत्याही ब्रँडची जाहिरात केली जात नाही. कोणत्याही फेकन्युज पसरविल्या जात नाहीत.