‘सिनियर सिटिझन्स’साठी खास ‘शो’ आयोजित

0
693

१३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ सिनियर सिटीझन’ चित्रपटाच्या एका खास शोचे दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व ‘सिनियर सिटिझन्स’ साठी हा स्पेशल शो आयोजित केला होता.  मोहन जोशी आणि स्मिता जयकर अभिनित ‘सिनियर सिटीझन’ ह्या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे.  ‘सिनियर सिटीझन’ हा सिनेमा म्हणजे आजची तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील नात्यावर टाकण्यात आलेला प्रकाशझोत आहे. आजच्या सर्व सिनियर सिटीझन लोकांना ‘सिरिअस सिटीझन’ होण्याची जास्त गरज आहे. हाच विचार सर्व वयस्कर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे. तर ओम क्रिएशन माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग यांनी या सिनेमाची निर्मित केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर यांच्यासोबत सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, विजय पाटकर, शीतल क्षीरसागर, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार हे  कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला  तर प्रमोद सुरेश मोहिते चित्रपटाचे एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर आहेत.