अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ !

0
931

अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरची थोपटली पाठ !

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा ह्या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे.

पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला ह्या फिल्ममध्ये उर्दूमध्ये संवाद होते. आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पून्हा एकदा आता ‘राजीमध्ये मुस्लिम भूमिकेत ती दिसणार आहे. ‘कट्यार..’नंतर हा सिनेमा करताना पून्हा एकदा अमृताने उर्दूच्या शिकवण्या घेतल्या.

अमृता ह्याविषयी म्हणते, “कट्यारपेक्षाही ह्या सिनेमात जास्त कठीण उर्दू होतं. त्यात मी मशहूर गीतकारशायर गुलजार ह्यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, मी सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघनामॅमनी माझ्या तयारीचं कौतुक केले.”

ती पूढे म्हणते, “मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामूळेच तर ऑडिशन झाल्याझाल्या मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केले. सिनेमाचे शुटिंग सुरू झाल्यावर काही सीन्समध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघनामॅमने माझी पाठ थोपटली. आणि ह्याचा अर्थातच मला अभिमान वाटतो.”